पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा तर एकावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: सासवड पोलिसांनी मंगळवारी दि. 29 रात्री सव्वानऊच्या सुमारास सासवड (ता. पुरंदर) येथील पीएमटी स्टॉप जवळील मगरबेकरी मागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका दुकानावर छापा टाकत, विजय वसंत जाधव (वय 36 रा. यशराज हॉटेल, लांडगे अळी सासवड) याला अटक केली आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार विजय जाधव हा 'मेन बाजार' नावाचा मटका जुगार चालवत असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार सागर सावता कोरडे आणि पोलीस हवालदार अमोल लडकत यांनी दोन पंचासह छापा टाकला. छाप्या दरम्यान, विजय जाधव हा एका कागदावर आकडे लिहून, लोकांकडून पैसे गोळा करताना रंग हात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून 'मेन बाजार' नावाचा मटक्याचा कागद, कार्बन पेपर आणि जुगारासाठी वापरलेली सहाशे दहा रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून मिळाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments