पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे एक अज्ञानाचा मृतदेह आढळला सासवड प्रतिनिधी: झेंडेवाडी( ता. पुरंदर) येथील क्वालिटी कंपनी मागे वाघजाई मंदिराच्या वरच्या बाजूला मंगळवारी( दि. 29) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे 42 वर्षाच्या पुरुषाचा हा मृतदेह असताना, मयताची ओळख पटू शकली नाही. या मृतदेहा बाबतची तक्रार पोलीस पाटील सारिका विकास झेंडे( रा. झेंडेवाडी ता. पुरंदर) यांनी दिली आहे. हा मृतदेह पूर्णपणे खराब झालेल्या अवस्थेत, मिळून आला आहे. मयत व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे :वय अंदाजे 42, नाव पत्ता माहित नाही, उंची अंदाजे पाच फूट सहा इंच, अंगाने मजबूत, केस बारीक काळे, अंगामध्ये भायाचा मोरपंखी रंगाचा असलेला टी-शर्ट फुल काळी पॅन्ट असे आहे या मृतदेहाबाबत माहिती असल्यास किंवा त्याचे नातेवाईक मिळून आल्यास सासवड पोलिसांशी संपर्क करावा, सासवड पोलीस ठाणे 02115/ 222333 तेथे संपर्क करण्याचे आवाहन, सासवड पोलिसांनी केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments