पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराची अखेर आठ महिन्यानंतर बदली; तर बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केल्याचा ठपका सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचा एका बिंगो- चक्री विभागाच्या अड्ड्यावर चक्री खेळत असल्याचा, व्हिडिओ प्रसिद्ध झाला असल्यामुळे, या घटनेमुळे एकच खळबळ उडून, पोलीस दलाची प्रतिमा मलीन झालेली होती, या घटनेची पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आठ महिन्यानंतर दखल घेऊन, त्या संबंधित पोलीस हवालदारावर बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून, बदली केलेली आहे. विजय जावळे असे बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव विजय जावळे यांची सासवड पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयांमध्ये बदली झाल्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी गुरुवारी दि. 11 रोजी संध्याकाळी दिलेले असून, या आदेशात असे म्हटले आहे की, भोर उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून विजय जावळे यांचा कामात कसुर केलेला अहवाल पोलीस मुख्यालयात प्राप्त झाला आहे, पोलीस हवालदार विजय जावळे यांनी अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार पद्धतीने गैरवर्तन केले असल्याचे, प्राथमिक चौकशी अंति दिसून आले असून, त्यांच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झालेली आहे, त्यांच्या गैरवर्तनामुळे यापुढे अनुचित घटना घडू नये, म्हणून त्यांची सासवड पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलेली आहे ,असे संदीपसिंह गिल यांनी आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. प्रकरण काय आहे हे सविस्तर वाचावे: सासवड पोलिसांनी बिंगो चक्री जुगाराच्या अड्ड्यावर 28 मार्च 2025 रोजी छापा टाकलेला होता ,याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून, मात्र पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मोठ्या आर्थिक हितसंबंधापोटी मोकाट सोडून दिले होते, तसेच सदर ठिकाणी टीव्ही दुरुस्तीचे काम सुरू असल्याची नोंद पोलीस ठाण्यातील धायरीमध्ये करून, तो विषय कायमचा मिटवला होता, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळेच पोलीस हवालदार विजय जावळे हे भिंगो चक्री जुगाराच्या अड्ड्यावर पैसे लावत खेळत असल्याचे, दिसत आहे एका मिनिटाच्या आत पैशे जिंकले ,तसेच अवैधरित्या जिंकलेली माया खिशात घातली, आणि लगेचच रपुचकर झाले होते, यावरून त्यांना जुगार खेळण्याचा मोठा अनुभव असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याकारणाने, जर पोलीसच जुगार खेळत असतील तर इतरांनी त्यांचा काय आदर्श घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक इशाराच सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत, म्हणून नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत, मात्र अवैध धंदे काही बंद झालेली नाहीत, कारण हे अवैध धंदे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या शुभ आशीर्वादाने बिनधास्तपणे सुरू आहेत ,कुंपणच शेत खात असल्याने, सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे सासवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले, परंतु स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या कारवाईमुळे विशिष्ट व जबाबदार गैरवर्तन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक इशाराच मनावा लागेल.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments