भूसंपादनसाठी दर निश्चितीची सोमवारी बैठक तर पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथील प्रास्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी 32/1 परवानगी राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून, भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, दरम्यान, दर निश्चितीसाठी येत्या सोमवारी दि. 8 रोजी शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक होणार असून, भूसंपादनाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे उचलेले असल्याचे, मानले जात आहे, पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी, आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, भूसंपादना पोटी द्यावयाच्या मोबदलयाच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल, 11 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, हा अहवाल राज्य सरकारने मान्य करून, तो उद्योग विभागाकडे पाठविला, या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32/1 कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणे आवश्यक असते, आठ दिवसापूर्वी उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी. अनबलगन त्यांची भेट घेऊन, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चर्चा केली होती, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या 32/1 चा प्रस्ताव उद्योग विभागाकडून त्यास मान्यता देण्यात आली आहे, ही मान्यता मिळाल्याने, आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्याचा जिल्हा प्रशासनाला मान्यता मिळालेली आहे. महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे: पुरंदर तालुक्यातील सात गावातील 1,285 हेक्टर अर्थात 3,000 एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यासाठी आत्तापर्यंत सुमारे सव्वा बाराशे हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्याकडून संमती. सुमारे 50 हेक्टर क्षेत्र अजूनही संमतीविना नकाशाच्या बाहेरील सुमारे 240 हेक्टर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची मान्यता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32/3 तरतुदीनुसार, शेतकऱ्यांचा मोबदला तयार करण्याचे काम पूर्ण होणार यासाठी सुमारे 5000 कोटी रुपये खर्च अपेक्षित. भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासाठी येथे सोमवारी शेतकऱ्यांबरोबर बैठक बोलवण्यात आली आहे, चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार आहे. दरा बाबतचा निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments