Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वाघीरे महाविद्यालय मध्ये वाचन उपक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण सासवड मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय मध्ये पुणे पुस्तक महोत्सव 2025 च्या निमित्ताने शांतता पुणेकर वाचत आहेत, हा वाचन उपक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांच्या संकल्पनेतून कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संस्था आणि महाविद्यालयाच्या नावाची लोगो तयार करून, या उपक्रमाची भव्यता दर्शवली, या उपक्रमात कनिष्ठ विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके, उप प्राचार्य प्राध्यापक सुधीर रोकडे, प्राध्यापक राजेश देशमुख ,रवी जाधव, उपस्थित होते .कनिष्ठ विभागाचे अध्यापक अमर होळकर ,प्रताप किरदार, शारीरिक शिक्षण संचालक विकास मुजुमुले, मनीषा ताकवले, मनीषा चोपडे,दिपाली इंगळे, श्रीनिवास खेत्रे, संतोष लोणकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments