विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ : प्राचार्य विजय चिकणे सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: "विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हापातळीवर श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरीचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल. असे प्रतिपादन प्राचार्य विजय चिकणे यांनी आज केले. काळदरी (ता.पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व व ज्युनियर कॉलेजमध्ये आज शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य चिकणे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी आदर्श शिक्षक संजय जगताप होते. अशा प्रकारचे आगळे वेगळे शालेय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जि प प्राथ शाळा काळदरी येथील सर्व विद्यार्थी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच जि प प्राथ शाळा काळदरी येथील मुख्याध्यापिका जयश्री कुंजीर, शिक्षिका शैला जाधव, अंगणवाडी सेविका रेखा कारकर, शितल कवितके आदी उपस्थित होते. 'विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत.' अशी अपेक्षा विद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख सुनंदा टकले यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी प्रास्ताविकात शासनाचा प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला. प्रयोगशाळा विभाग प्रमुख पंडित चेंडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे संजय जगताप व जि प प्राथ शाळा काळदरी येथील मुख्याध्यापिका जयश्री कुंजीर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात विद्यालयातील सर्व वर्गातील ९८ विद्यार्थ्यांच्या विविध वैज्ञानिक संकल्पनेवर आधारीत वैज्ञानिक प्रयोगांच्या उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक पांडुरंग दुर्गाडे, बाळू पोमणे, शिवाजी गोडसे, सुनिल घोडके, कविता शेलार, प्रमिला घोडके व संतोष दोडके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पुरंदर तालुका उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा संतोष नवले यांनी केले तर आभार पंडित चेंडके यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments