अमित झेंडे फाउंडेशन तर्फे रायगड संवर्धन मोहीम सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्वराज्य गडसंवर्धन मोहिमे अंतर्गत "युवकांना धरून हात स्वराज्याची चालू वाट" या संकल्पनेत अंतर्गत 21 डिसेंबर रोजी अमित झेंडे फाउंडेशन तर्फे पुरंदर तालुक्यातील 4000 महिला व पुरुषांना रायगडाची स्वराज्य गड संवर्धन मोहीम करण्यात आली.अडचणींवर मात करून संघर्षातून वाट काढून स्वराज्याची निर्मिती करून रयतेचे राज्य निर्माण केले. याच संघर्षाची युवकांना जाणीव होऊन प्रेरणा मिळावी, संघर्षाचे साक्ष असलेले हे गड किल्ले यांचे संवर्धन करून या मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा व अजरामर संदेश युवकांच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे महिलांना गडाची संपूर्ण माहिती हवी यासाठी गाईड्सचे नियोजन करण्यात आले होते. तसेच गडावर मर्दानी खेळ ठेवण्यात आले होते. व सर्व मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांसाठी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते.चौकट : गडकिल्ले संवर्धन मोहिमेत माझ्यासह सहभागी झालेले प्रत्येक सेवक समानतेच्या पातळीवर काम करतात. प्रगती साधायची असेल तर सर्व धर्मीयांना सोबत घेऊन काम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गरज आहे. त्यांचे विचार अभाधित ठेवायचे असतील आणि नव्या पिढीला पेरणा व ऊर्जा द्यायचे असेल तर गड किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. अमित झेंडे फाउंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष अमित झेंडे. यांनी सांगितलेगड संवर्धन मोहिमेत गडाची पहिली पायरी चढताना वेगळी ऊर्जा प्रेरणा मिळते. अशा मोहिमांनी जगण्याला बळ मिळते. अशा मोहिमेद्वारे तरुणांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता व अभिमान निर्माण होतो. या मोहिमेत हजारो शिवप्रेमी नागरिक आणि तरुण व महिला मोठ्या संख्येने सहभागी होते.चौकट : स्वराज्य गड संवर्धन मोहिमेअंतर्गत अमित झेंडे फाउंडेशन तर्फे सर्व युवक व महिलांसाठी अतिशय उत्तम असे नियोजन केले होते. गडाची संपूर्ण ओळख व माहिती देण्यासाठी गाईडचे नियोजन केले होते. अशा मोहिमांद्वारे तरुणांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता व अभिमान निर्माण होते.संतोष खेडेकर यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments