Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पांगारे पर्यंत ग्रामस्थांनी पकडले चोरटे आणि गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसाकडून शक्यता व्यक्त केली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: परिंचे ता. पुरंदर परिसरामध्ये महिलां एकट्यांना पाहून, मंगळसूत्र तसेच सोन्याची दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या तीन चोरट्यापैकी दोन जणांना पांगारे ता. पुरंदर येथील तरुणांच्या मदतीने परिचे पोलिसांनी पकडून अटक केली. परिंचे गावाजवळ वीर सासवड रस्त्यावर पोलदार ही लोकवस्ती आहे, येथे सोमवारी दि. आठ रोजी संध्याकाळी पाच वाजता नर्मदा धर्माजी दुधाळ (वय 75) या अंगणातील ओट्यावर बसल्या होत्या, त्यावेळी मोरेश्वर दुधाळ हे रस्त्याच्या कडेला मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी उभे होते, तेव्हा त्या ठिकाणी तीन संशंयित युवक उभे होते, त्यांच्या आपापसात गप्पा सुरू होत्या, त्यावेळी दुधाळ यांनी त्यांच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता, मुलांची स्कूल बस आल्यावर, मोरेश्वर दुधाळ मुलांना घेऊन घरात गेला की लगेच या चोरट्यांनी नर्मदा दुधाळ यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला, नर्मदा दुधाळ यांनी आरडाओरडा केला असता, लगेच मोरेश्वर दुधाळ यांनी गाडीवरून पाठलाग करण्यास सुरुवात केली, स्थानिक परिसरातून तृप्ती धनंजय काकडे (वय 32)या शेतातून घरी जात असताना, या चोरट्याने पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला, त्यांना तातडीने याबाबत पोलीस पाटील तानाजी काकडे यांना माहिती दिली. त्यांनी परींचे पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप पवार यांना खबर देऊन, चोरटे हरगुडे गावच्या दिशेने गेले असल्याचे सांगितले, पांगारे, खेगरेवाडी, हरगुडे येथील तरुण व शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांना पकडून अटक केली. सोहेल आयुब शेख (वय 23) सध्या राहणार येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक पुणे. प्रशांत विजय गायकवाड (वय 24) सध्या राहणार पांडे तालुका भोर यांना अटक केली तर हमीद शेख राहणार येवलेवाडी पुणे हा पळून गेला, याबाबत तृप्ती धनंजय काकडे राहणार पांगारे व मोरेश्वर विनायक दुधाळ राहणार परींचे यांनी फिर्यादी दिली आहे या चोरट्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, हवालदार विशाल जाधव, संदीप पवार पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments