Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवडकर वाहतूक कोंडीने त्रस्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील शहरांमध्ये दर सोमवारी भरणारा आठवडे बाजार आणि त्यामुळे सायंकाळी निर्माण होणारी वाहतूक कोंडी सासवड करा साठी नित्यचीच ठरलेली आहे व डोकेदुखी सामान्य नागरिकांची झालेली आहे, विशेषता नगरपरिषद कार्यालय ते पालखी महामार्ग लगतच्या, एसटी स्थानक परिसरात दरम्यान: सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेमध्ये परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे, अक्षरशा: तर म.य.सो वाघिरे विद्यालयाची संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर, नगरपालिकेच्या शेजारी त्या ठिकाणी फळांची त्या ठिकाणी हात गाड्या लागलेल्या या पूर्णपणे रोडवरती येत असून, त्या ठिकाणी नगरपालिका व पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी सोमवारचा कुठलाही बंदोबस्त नसतो, सासवड नगरपालिकेसमोरील पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बाहेरील फळ विक्रेते, हातगाड्या लावतात, हा मार्ग शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गावठाण नारायणपूर आणि कोंढवा रस्त्याकडे जातो तो जवळ शैक्षणिक सहकुल शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि पालखीचे शॉपिंग सेंटर असल्याने, येथे नेहमीच वरदळ असते, सायंकाळी फळे विक्रेते खरेदी करण्यासाठी ग्राहक थेट रस्त्यावर गर्दी करतात, यामुळे अंतर्गत आणि महामार्गावरील वाहनांची कोडी होत आहे, पादचाऱ्यांना चालणे ही मुश्किल होत आहे, वाहतूक कोंडी झाल्यावर पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते, परंतु या ठिकाणी वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे, दर सोमवारची समस्या ही बनल्याने, तात्पुरत्या उपायांनी नागरिकांची गैरसोय दूर होत नाही, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, पालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन, या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, ठोस आणि कायमस्वरूपी भूमिका घेतली पाहिजे ज्ञानेश्वर( माऊली काका) जगताप उद्योजक, पुरंदर. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, पालिका प्रशासनाशी चर्चा केलेली आहे, कायमस्वरूपी होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे, बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी पालिकेसमोर हातगाडी लावणाऱ्यासाठी गावठाणात बाजाराच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात येईल, कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड.

Post a Comment

0 Comments