जिल्हाधिकाऱ्यांच्या सोमवारची होणाऱ्या बैठकीसाठी शेतकरी सहित उपस्थित न राहण्यासाठी सात गावचे सरपंच व उपसरपंच खुद्द जिल्हाधिकारी यांना देणार पत्र सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय प्रस्तावित पुरंदर विमान तळसंदर्भात खानवडी येथे झालेल्या, सात गावच्या विमानतळा बाबत मीटिंग ही शेतकरी, सरपंच, उपसरपंच, सामान्य नागरिक, महिला मंडळ, यांची मीटिंग घेण्यात आली, एक तर जिल्हाधिकारी यांना आम्ही जमीन मोजणीसाठी फक्त संमिती दिली होती, जमीन मोजणी झाल्यानंतर, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचा दर व जमिनीचा परतावा ठरवू असे सांगितले होते, प्रत्यक्षात प्रत्येक वेळी म्हणजे पहिली मीटिंग सुद्धा शेतकरी यांना संमतीत न घेता सात गावातील फक्त एजंट हे अधिकारी, वर्गापाशी लुडबुड करतात ,तर त्यांना बाजूला सारा म्हणजे शेतकरी हा पुढे घ्यावा, व एजंट याला मागे बसवा, शेतकरी यांचे गाराणे ऐकून घ्यावे, पुरंदर मधील पालखी महामार्ग साठी एक गुंठासाठी दहा ते बारा लाख रुपयांनी व्यवहार केला जातो, मग विमानतळासाठी एक एकर साठी 40 गुंठे होतात, तर साधारण पाच ते सहा कोटी एकरला व्यवहार हा शेतकरी बांधव यांना दिला पाहिजे, असा एजंटगिरी करणारे पुढे का? सर्वसामान्य शेतकरी याला बोलण्यासाठी दुसरी ,तिसरी मीटिंग बोलवणे गरजेचे आहे, परंतु आत्तापर्यंत शेतकरी मागे, तर एजंटगिरी करणारे, अधिकारी हे पुढे पुढे करतात, तर आमची शेती विमानतळाला द्यायची नाही, सर्वसामान्य शेतकरी हा खुद्द अन्नदाता, काळी माती त्याची 'आई' आहे. एजंटला अधिकारी वर्गाने बाजूला सारावे व सर्वसामान्य शेतकरी याला तुम्ही न्याय द्यावा, यामुळे प्रत्यक्षात प्रत्येक वेळी हे जिल्हाधिकारी यांनी मीटिंग ही शेतकऱ्यांची न बोलवता, फक्त अधिकारी व एजंट यांनाच प्राधान्य दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अवहेलना केलेली आहे, अशी भावना झालेली आहे, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी फक्त शेतकरी सोबत दराची संदर्भात चर्चा करताना, एक कोटी तीस लाख रुपयांचीच व दहा टक्के परतावा या मुद्द्यावरच लोकांचे मत परिवर्तन करत आहेत, अशी शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे, जिल्हाधिकारी मीटिंग बोलावून शेतकऱ्यांची विमानतळासाठी संमती आहे व दरासंदर्भात व परताव्या संदर्भातही शेतकऱ्यांची संमती आहे, असाच ठराव शासनाला पाठवत आहेत ,असाच समज हा शेतकऱ्यांचा झालेला आहे. सोमवारी विमानतळाच्या संदर्भात कोणतेही प्रकारची चर्चा करायची नाही, असाच ठराव हा शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला, तरी यासाठी सदरची सोमवारची मीटिंग ही फक्त शेतकऱ्यासाठी पुढील वाट ठरवून घ्यावी, एजंटला बाजूला सारावा , मगच शेतकरी मिटींगला घ्या, असा ठराव करण्यात आलेला आहे ,त्यासाठी मीटिंगच पुढे ढकलावी, यासाठी सात गावच्या सरपंच व उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्याचे ठरवलेले आहे, हे पत्र पुणे येथे मीटिंग घेणे, अपेक्षा सर्व सामान्य शेतकऱ्यांसोबत मीटिंग घ्यावी, दर हा दहा ते वीस जण एजंट हे आमचे जमिनीचे दर व जमिनीचा परतावा ठरवणारे मालक नाहीत, तर फक्त ते एजंटगिरी करून शेतकऱ्यांचे टाळूवरची लोणी खाणारे एजंट आहेत, सात गावच्या संयुक्तिक मीटिंगमध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे एक सोमवारी होणाऱ्या वाटाघाटीच्या मिटींगला कोणीही शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही. दोन तसे पत्र सर्व ग्रामपंचायत या लेटरहेडवर लिहून जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार आहेत. तीन जोपर्यंत शेतकऱ्यांनी मागणी केलेले अहवाल शेतकऱ्यांना दाखवले जात नाहीत, तोपर्यंत शेतकरी हा कुठल्याही चर्चेला सामोरे जाणार नाही. चार सोमवारी असलेल्या मीटिंगची माहिती कुठल्याही शासनाच्या अधिकृत प्रतिनिधीकडून, मिळालेली नसल्याने ,ती संशयास्पद आहे. पाच मागच्या अनुभवावरून नियोजित मीटिंगमध्ये शेतकऱ्याच्या बोलण्यावर दबाव टाकून बंधने आणली जात आहेत, असेच निदर्शनास येत असल्यामुळे, इथून पुढे चर्चाही गाव पातळीवर होतील असे सर्वसामान्य शेतकरी यांचे म्हणणे आहे. हे सर्व निर्णय शेतकऱ्यांनी गट ,तट बाजूला सारून एकमुखाने घेतलेले आहेत, कुंभारवळण या ठिकाणची शेती फक्त संमती जमीन मोजणीसाठी दिलेली असून, कारण याचे 17 सप्टेंबर पर्यंत विमानतळाची संमती कुंभारवळ्णची 75 टक्के होती मग 24 व 25 सप्टेंबर रोजी सर्वसामान्य शेतकरी यांनी वकिलांचा सल्ला घेऊन, विमानतळाच्या जमीन मोजणीसाठीच संमती दिली ती म्हणजे दोन दिवसांमध्ये ७२ टक्के झाली होती, परंतु 75 टक्के व 72 टक्के मिळून 147% होत होती, त्यात माहितीच्या अधिकारांमध्ये जाऊन, ती संमती म्हणजे 17 सप्टेंबर पर्यंत 28% तर 24 व 25 सप्टेंबर रोजी 72 टक्के अशीच होती, परंतु 17 सप्टेंबर पर्यंत कुंभारवळण गावातील एजंट आणि 75% संमती झाली आहे, अशी खोटी माहिती देऊन एक प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, त्यासाठी आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी असून, उद्योजक जर शेतकरी होऊ शकतो? तर शेतकरी हा उद्योजक का नाही ?होऊ शकत, त्यासाठी आताच्या सरकारने आमच्यावर ही वेळ आणू नका? विमानतळाची पुरंदर विमानतळाबाबत मोबदलेच्या स्वरुपात शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. गणेश काशिनाथ मोरे शेतकरी, कुंभारवळण. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, त्या म्हणजे दुसरी, तिसरी मीटिंगसाठी एजंटला मागे बसवा, सर्वसामान्य शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, खुलेआम जिल्हाधिकारी यांनी चर्चा करावी. त्यासाठी सोमवारची मीटिंगची फक्त अधिकारी व एजंट साठीच आहे, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नाही, त्यासाठी सोमवारची मीटिंग रद्द करावी व पुढे ढकलावी व खुद्द शेतकऱ्यांच्या सोबतच चर्चा करावी, अशी सर्व माहिती प्रतिनिधीला गणेश काशिनाथ मोरे शेतकरी, कुंभारवळण यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments