पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये मजुराचा खून; फिर्यादीनुसार पोलिसांकडून एक संशयित ताब्यात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर परिसरामध्ये मंगळवारी दि. नऊ रोजी सकाळी पालखी महामार्ग लगत, एका वाईन शॉप च्या मागील बाजूस बांधकाम सुरू असलेले ठिकाणी काही जिन्याखाली एका बांधकाम मजुराचा धारदार शस्त्राने मान आणि पोटावर वार करून खून केलेला मृतदेह आढळून आला, राजू दत्तात्रय बोराडे (वय 38 )राहणार महाडा कॉलनी सासवड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी आपल्या एका पथकासह तातडीने, घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हा खून कोणत्या कारणातून झाला असावा ,या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे, संशयताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याबाबत मयताचा भाऊ गजानन दत्तात्रय बोराडे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञानी विरोधामध्ये फिर्याद दाखल केली आहे, शेवटी अहवाला नंतर अनेक महत्त्वाचे दागेद्वारे मिळण्याची शक्यता आहे, घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि बोटाचे ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली, मारे कराणचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, याबाबत माहिती मिळवताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट दिली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments