पळसनाथ प्राथमिक विद्यालयात आनंदी बाजार मेळाव्याचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमातंर्गत पळसदेव तालुका इंदापूर येथील पळसनाथ पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयात बाल आनंदी बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आत्मसात व्हावे , सामाजिक कौशल्यांचा विकास व्हावा तसेच आर्थिक व्यवस्थापन शिकता यावे यासाठी विद्यालयात आनंदी बाजार मेळाव्याचे केलेले आयोजन हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून आनंदी बाजार मेळाव्यामधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व जबाबदारीची जाणीव होते आणि विविध शैक्षणिक मूल्य जोपासली जातात असे मत पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांनी बालआनंदी बाजार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले . यावेळी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे ,संचालक राजेंद्र काळे , पळसनाथ विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक , संतोष पवार , प्राथमिक विद्यालयाच्या प्राचार्या सिद्धमा पाटील ,पळसदेवचे माजी सरपंच आजिनाथ पवार , रामदास पवार , मल्हारी काळे , संजय शेलार, मनोज खत्री , दिगंबर मरळे , प्रकाश भोसले यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पालकवर्ग ,शिक्षक शिक्षकेत्तर , विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते . दरम्यान पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील बालगोपाळांनी कांदे वांगी बटाटे मिरची कोथिंबीर पालक मेथी यासारख्या पालेभाज्या व फळभाज्या विविध प्रकारची फळे विक्रीस आणली होती. याशिवाय खाऊ गल्ली विभागांमध्ये वडापाव इडली सांबर पाणीपुरी चटकदार भेळ आदी प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते . या मेळाव्यात बैलगाडी राईड हा सर्वांत जास्त आकर्षणाचा विषय ठरला . आनंदी बाजार मेळाव्यासाठी भेट दिलेल्या पालक ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी सर्व पालेभाज्या वस्तूपदार्थांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. बाजार मेळाव्यातील वस्तूंची खरेदी विक्री करताना या बाल गोपाळांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता . पालक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या आनंदी बाजार मेळाव्यास आठवडे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.आनंदी बाजार मेळावा संपन्न होण्यासाठी प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सिद्धमा पाटील , रूपाली हिंगमिरे अरुणा काळे राधिका जाधव ,ललिता काळे पूजा सूर्यवंशी ,रेश्मा अडवाल , मदिना शेख ,सुवर्णा माने , अमोल मिसाळ सुरज काळे प्रशांत काळे यांनी नियोजन केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments