Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड मध्ये माजी आमदार संजय जगताप भाजप विरुद्ध आमदार विजय शिवतारे शिवसेना (शिदे गट) यांची प्रतिष्ठा पणाला तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दोन्हीकडून केला जातोय विजयाचा दावा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषदेसाठी अतिशय चुरशीने मतदान झाल्यानंतर, मतमोजणी लांबल्याने मोठा राजकीय सस्पेन्स निर्माण झालेला आहे ,माजी आमदार संजय जगताप यांच्या पातळीवरील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदी (काकी) जगताप आणि विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचे (शिंदे गटाचे) सचिन भोंगळे यांच्यातच मुख्य लढत होत आहे ,तर नगरसेवक पदासाठी 20 जागासाठी 47 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भाजप,शिवसेना (शिदे गट),महाविकास आघाडी,अपक्ष यामधून लढत होत आहे ,त्यामुळे आगामी राजकीय हालचाली या निवडणुकीत पणाला लागलेल्या आहेत, मतमोजणी पुढे ढकलल्याने, उमेदवार चिंतेत ,अफवामुळे, डोकेदुखी ,तर ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसावर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे, सासवड नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात चिंतेत असून ,अफवामुळे, डोकेदुखी ही वाढली आहे, मतदानानंतर निकालाची एक प्रकारे उत्सुकता असताना, मतमोजणीसाठी तारीख बदलल्याने, मागील काही दिवसापासून त्याने आपले काम केले नाही, तो फुटला, तो रुसला ,त्यांनी पैसे घेऊनही मतदान केले नाही, अशाच चर्चामुळे टपरीवर, चौका चौकात व पारावर मोठ्या प्रमाणात रंगत दिसून आलेली दिसते .न्यायालयाच्याआदेशानुसार 21 डिसेंबर रोजी निकाल होणार आहे ,चलबिचल वाढलेली ,अनपेक्षित बदलल्यामुळे उमेदवार व समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे, मतमोजणी उशिरा असल्याने ,काय निकाल लागेल, कोणता गट किती मते मिळविल ,यावर अंदाज बांधणे चालू आहे, त्यामुळे उमेदवारांची चल बिचल वाढलेली आहे ,त्यासाठी मतमोजणी पुढे ढकलने खूप अवघड झालेले आहे, असा भरपूर उमेदवारांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे, त्यासाठी 21 डिसेंबर ही तारीखेला सर्वांच्या नजरा ,डोळे त्या ठिकाणी मतमोजणीकडे लागलेल्या आहेत, तर निरीक्षकांचे महत्त्व वाढलेत नेत्यांच्या संपर्कामुळे, निरीक्षकांचे महत्त्व वाढले आहे, आता राजकीय निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते ,सेवानिवृत्त अधिकारी तसेच विविध बिगर राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पण मतमोजणीच्या दिशेचा अंदाज घेऊ लागलेले आहेत ,काही जण तर त्या व्यक्तींना प्रत्यक्ष बोलावून चर्चा करून कोणत्या गटाला किती मताची शक्यता आहे ,मतदानानंतर मतमोजणी निर्माण झालेल्या उत्सुकता व अनिश्चितता विविध व्यक्तींचे महत्त्व अचानक वाढले आहे, राजकीय निरीक्षकांच्या चर्चा वरून ,काही नेते धोरण ,आखत आहेत, तर काहींनी आघाड्या किंवा संपर्काची तयारी ही सुरू केलेली आहे, मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी ही आता पोलिसांवर येऊन पडलेली आहे ,तर निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,सर्व मतदान मशीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ,त्यामुळे परिसरात ही दिवस -रात्र जागता- पहारा ठेवण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ,गेल्या पंधरा दिवसापासून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान ,शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या अधिपत्याखाली सासवड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगलीच मदत केली आहे ,प्रभाग क्रमांक चार ब मधून स्मिता सुहास जगताप भाजपच्या बिनविरोध निवड ही झाली आहे, तर प्रभाग क्रमांक 11अ मध्ये हेमलता मिलिंद इनामके यांच्या विरोधात न्याय प्रविष्ट निर्णय असल्यामुळे, निर्णयानुसार 20 डिसेंबर रोजी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर सासवडलाच नाही तर महाराष्ट्रात 21 डिसेंबरला सर्वांचाच निकाल लागणार आहे ,प्रत्यक्ष मतदान ३३,६५६ मतदारापैकी 22, 557 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यामध्ये 11,412 पुरुष मतदान व 11,145 महिला मतदारांचा समावेश आहे ,यावर्षी सासवडला मतदानाचा टक्का घसरून 67.02 टक्क्यावर मतदान झाले, त्यामुळे माजी आमदार संजय जगताप भाजप विरुद्ध आमदार विजय शिवतारे शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मुख्य लढत होत असताना, दोन्हीही बाजूंनी सध्या तरी विजयाची दावा करीत आहेत, कार्यकर्ते पैंजा लावत आहेत ,त्यामुळे 21 डिसेंबर रोजी खरे चित्र स्पष्ट होईल हेच सध्या तरी वाटत आहे.

Post a Comment

0 Comments