गाईड–स्काऊट कॅडेट्सचा लखनऊ येथे डंका!!! सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्याउत्तर प्रदेशातील लखनऊ येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या डायमंड जुबली ग्रँड फिनाले व १९ व्या राष्ट्रीय स्काऊट–गाईड जांबोरीत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथील गाईड व स्काऊट कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी करत पुणे जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर उंचावला. पुणे जिल्ह्यातून या राष्ट्रीय स्तरावरील जांबोरीसाठी एकूण १३ गाईड कॅडेट्स आणि १४ स्काऊट कॅडेट्स यांची निवड झाली होती. ही बाब शाळेसाठी अत्यंत अभिमानाची ठरली आहे. जांबोरीच्या उद्घाटनप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या, तर शेकोटी (Camp Fire) कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. समारोप समारंभात भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित राहून सर्व स्काऊट व गाईड कॅडेट्सना प्रेरणादायी संदेश देत आशीर्वाद दिला. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून ३३,००० हून अधिक स्काऊट–गाईड कॅडेट्स या जांबोरीत सहभागी झाले होते. तसेच श्रीलंका, मालदीव, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया या देशांचे प्रतिनिधीही या आंतरराष्ट्रीय सोहळ्यास उपस्थित होते.विद्यालयाच्या स्काऊट गाईड कॅडेट्सनी कॅम्प क्राफ्ट, शेकोटी सादरीकरण, शोभायात्रा, नाईट हाईक, इथनिक फॅशन शो, संचलन, बँड पथक,स्किलोरामा,पायोनियरिंग प्रकल्प, कलर पार्टी, फूड प्लाझा, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज, स्टेट गेट कॉम्पिटिशन व फिजिकल डिस्प्ले अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत घवघवीत यश प्राप्त केले. महाराष्ट्राच्या लोकधारेचा दारुण विजय – राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक या संपूर्ण जांबोरीतील सर्वात मोठा, अभिमानास्पद व ऐतिहासिक क्षण म्हणजे ग्रँड कॅम्प फायर (Grand Camp Fire) या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला. हा नृत्यप्रयोग शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथील शिक्षिका(स्काऊट मास्टर) शितल श्रीराम बोरुडे मॅडम यांनी महाराष्ट्राच्या लोकधारेवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित संकल्पना मांडून बसवला होता. या कलाकृतीचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शन, संकल्पना व सादरीकरणाचे नियोजन त्यांनी केले होते. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, शौर्य, परंपरा आणि पराक्रमाचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या या नृत्यसादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले आणि या सादरीकरणाला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला. हा गौरव केवळ शाळेसाठी न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला मिळालेली मानाची पावती ठरला आहे.राष्ट्रपतींना दिली सलामी – शिरपेचात मानाचा तुरा! शाळेसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे विद्यालयाच्या स्काऊट–गाईड कॅडेट्सनी राष्ट्रपतींना उत्कृष्ट संचलन करत सलामी दिली. राज्यपालांच्या स्वागतासाठी तसेच समारोप प्रसंगी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत कॅडेट्सनी दिलेली ही सलामी अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरली. या पथकाचे नेतृत्व स्काऊट मास्टर शितल श्रीराम बोरुडे मॅडम आणि गाईड कॅप्टन मिलन जाधव मॅडम यांनी केले. ‘AI सिटी ’ एक्झिबिशनने वाढवली वैज्ञानिक दृष्टी,विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी कॅम्प परिसरात उभारण्यात आलेल्या ‘AI सिटी’ मधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच भारतीय हवाई दलाच्या ‘एअर अग्निवीर एक्झिबिशन’ द्वारे युद्धभूमीतील विविध शस्त्रास्त्रे, विमाने आणि सुरक्षा प्रणालींबद्दल प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशरक्षणाबद्दल जाणीव, अभिमान व प्रेरणा अधिक दृढ झाली. त्याचप्रमाणे सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहा वाढवून मिळणार आहे.या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य रेणुका सिंग मर्चंट मॅडम, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम, जुनियर कॉलेज इनचार्ज उज्वला जगताप मॅडम, प्रीप्रायमरी इन्चार्ज स्वाती जगताप मॅडम तसेच जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत सर यांनी सर्व यशस्वी कॅडेट्स व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्या शिरपेचात आणखी एक सुवर्णतुरा रोवला गेला आहे. लखनऊ येथे गाजले सासवड… गाजला महाराष्ट्राचा अभिमान… आणि पुन्हा एकदा सिद्ध झाले – “शिवाजी स्कूलचे गाईड–स्काऊट राष्ट्राचा अभिमान!”
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments