Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील पोलीस पाटलांना किमान 40 हजार रुपये मानधन द्यावे; तर आठ हजार पदे रिक्त तीन गावांची एकावर जबाबदारी अशी स्थिती सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : संपूर्ण राज्यभरात पोलीस पाटलांची जवळपास 40 हजार पदे आहेत, यापैकी आठ हजार पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा पदभार कार्यरत पोलीस पाटलावर सोपविण्यात आला आहे,यामुळे एका पोलीस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याकारणाने, पोलीस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही, शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकासाठी लागणारा पेट्रोलचा खर्च ,वही ,कागद या वस्तू वेळेवर पुरवल्या जात नसल्यामुळे ,महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांचे गाराने थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडलेले आहे .चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे ,राज्य उपाध्यक्ष रवींद्र डोईफोडे व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होत. वयोमर्यादा 65 वर्ष करावी, पोलीस पाटलांना किमान 40 हजार रुपये मानधन द्याव,सेवा निवृत्तीचे वय 65 करावे ,नवीन भरती झालेले पोलीस पाटील उच्च शिक्षित असल्याने ,त्यांना कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, पोलीस पाटलांना दहा हजार रुपये रिटायरमेंट लागू कराव, सेवानिवृत्तीनंतर पात्र पाल्यांना घेण्यात यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.

Post a Comment

0 Comments