पुरंदर तालुक्यामध्ये गुणवंत रत्न म्हणून शिवाजी शेंडकर व मधुकरराव झेंडे यांचा सन्मान सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : मधुकर बाबुराव झेंडे यांनी विख्यात आंतरराष्ट्रीय गुंडांना पकडत असताना ,कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ,स्वतःच्या चारित्र्यावर कोणताही डाग न पडू देता, काम केलेले असून, हेच पुरंदर तालुक्याचे वैशिष्ट्य असल्याकारणाने, त्यांचे तालुक्यात सर्व क्षेत्रांमध्ये दिगज होऊन गेलेले असताना, स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही हा तालुका मागे नसल्यामुळ, पुरंदर मधील मातीचा ढेकूळ पाण्यात टाकला तरी येणारा तवंग हा इतिहासाचा असेल, असे अनेक गुणवंत माणसे पुरंदर तालुक्यामध्ये घडलेली आहेत, याचा शोध घेऊन, आम्ही त्यांचा सन्मान करीत आहे असे प्रतिपादन समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी केले. सासवड ता. पुरंदर येथे जालिंदर कामठे, मित्र परिवाराच्या वतीने सोमवारी दि.आठ रोजी पुरंदरचे गुणवंत रत्न भूविकास बँकेचे माजी संचालक शिवाजी कृष्णाजी शेंडकर व माजी एसीपी मधुकर बापूराव झेंडे यांचा सत्कार रावसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे,हेमंत माहुरकर, माणिकराव झेंडे पाटील, बापू भोर ,शामकांत भिताडे,वामन कामठे, शांताराम बोराडे, अरविंद शेंडकर ,रोहिदास कुदळे, भानुदास जगताप, सचिन पठारे, दत्ता राऊत आधी उपस्थित होते. यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले की, हल्ली फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते पुढे राजकारणात व समाजकारणात दिसतात, पण या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुरंदर तालुक्यात ज्यांनी उज्वल कार्य केले आहे, अशा मान्यवरांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांना व्हावे यातून भविष्यातील योग्य कार्यकर्ता तयार व्हावा, यासाठी जालिंदर कामठे मित्रपरिवार काम करीत आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी केले, सूत्रसंचालन संदीप देवकर यांनी केले, तर संतोष जगताप यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments