Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक संशोधन पद्धती या विषयावर एकदिवशीय राज्यस्तरीय वेबिनार उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलीटेकनिक, सासवड येथे “संशोधन पद्धती” या विषयावर दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. निलेश भोसले यांनी वेबिनारची रूपरेषा स्पष्ट करत संशोधन पद्धतीचे शैक्षणिक व औषधनिर्माण क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याची गरज व्यक्त केली.या वेबिनारमध्ये विविध मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. दादासाहेब कोकारे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी “संशोधन पद्धती: एक व्यावहारिक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करत संशोधनाची मूलभूत तत्त्वे, नियोजन व पद्धतशीर दृष्टिकोन यावर सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉ. विक्रांत धमक (विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी, अहमदनगर) यांनी “संशोधन डेटाचे सांख्यिकीय विश्लेषण: ग्राफपॅड प्रिझममधील प्रात्यक्षिक व अन्वयार्थ” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधनातील आधुनिक साधने व तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकला. तिसऱ्या सत्रात डॉ. मोनिका राव (AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांनी “औषधनिर्माणशास्त्रातील संशोधन नीतीशास्त्र: नवोपक्रम व जबाबदारी यांचा दुवा” या विषयावर मार्गदर्शन करत शैक्षणिक संशोधनातील गुणवत्ता व डेटा विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट केले. चौथ्या सत्रात डॉ. समीर नदाफ (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, पलूस) यांनी “प्रत्यक्ष कार्यवाहीतील DOE: संशोधन कार्यक्षमता व उत्पादन विकास वृद्धी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मास्युटिकल संशोधनातील प्रत्यक्ष अनुप्रयोग व संधी याविषयीही माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सृष्टी जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. सागर भिसे, प्रा. विशाखा गायकवाड, सुनीता बाठे तसेच डॉ. स्मिता पवार यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी प्रा. विशाखा गायकवाड (एचओडी, पॉलीटेकनिक) यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.या वेबिनारमध्ये राज्यभरातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून सहभागींच्या संशोधन पद्धतीविषयक ज्ञानात भर पडून भविष्यातील संशोधनासाठी त्यांना दिशा मिळाली.

Post a Comment

0 Comments