पुरंदर तालुक्यातील वीर येथील चैत्र अमास्येनिमित्त श्रीक्षेत्र वीर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री क्षेत्र वीर येथे आज शुक्रवार चैत्र वद्य अमावास्या 17एप्रिल रोजी अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. आज महाप्रसादाचे आयोजन राजेंद्र बुरुंगले व पोपट बुरुंगले, माळेगाव यांचेमार्फत करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, उनाच्या दाहकतेपासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस, इ. चे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसो धुमाळ यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण विश्वस्त, सल्लागार मंदिरात उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments