कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा यांची पुन: प्राणप्रतिष्ठा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र कोडीत मध्ये श्रीनाथ म्हस्कोबा याची पुन:प्राणप्रतिष्ठा केली जाणारा आहे, या निमित्ताने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रविवारपासून दिनांक 19 ब्रह्मा कलशोस्थव, महायज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव अशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीनाथ म्हस्कोबा प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या सुवर्णकलशाला 121 नद्यांच्या पाण्याने अभिषेक करून ,या सोहळ्यास प्रारंभ होईल, दिनांक एक मे रोजी महापूरणाहुती आणि महामंगल आरती करून, या सोहळ्याची सांगता होईल, याविषयी श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज tracts यांनी माहिती कळवलेली आहे, महायज्ञ सोहळ्यामध्ये चार वेदांचे पारायण केले जाईल ,सहस्रचंडी यज्ञ अतिरुद्र सोहकार, लक्ष मोदक हवन गणेश याग, विष्णूयाग सुदर्शनयाग, शिव पंचायतन, होम, यज्ञ आणि शिवपार्वती विवाह सोहळा यांचे आयोजन केले आहे. यज्ञ सोहळ्यात 151 ब्राह्मण आणि तीन हजार यजमान सहभागी होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये हरिभक्त परायण श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर ,हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज नामदास, हरिभक्त परायण आचार्य अमृता श्रम स्वामी महाराज, हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले, हरिभक्त परायण आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर ,हरिभक्त परायण कान्होबा महाराज देहूकर, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज देशमुख, हरिभक्त परायण बंडातात्या महाराज कराडकर, हरिभक्त परायण नामदेव महाराज लबडे, हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे यांचे कीर्तन होणार आहेत, हा कीर्तन महोत्सवात मंदिरांमधील सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळात होणार आहेत या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर आणि परिसरात जोरदार तयारी सुरू आहे, यज्ञ मंडप उभारण्यात आला असून, महाप्रसादासाठी देखील मंडप उभारला आहे ,या ठिकाणी प्रतिदिन तीस ते चाळीस हजार भक्तासाठी महाप्रसादाचे नियोजन केले जाणार आहे, मंदिराला रंगरंगोटी केली असून, सुवर्णकलश जलाभिषेक करण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था मंडपाच्या माध्यमातून केली आहे, याविषयीची श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज tracts व कोडीतकर येथील ग्रामस्थांनी ही माहिती दिली आहे.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘'"Purandar Prime News""’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: """Purandar Prime News"""/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 Comments