पुरंदर तालुक्यातील मस्कोबा मंदिरामध्ये पीक पाण्याचा अंदाज;तर गुढीपाडव्यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरांमधील जोगेश्वरी ची महापूजा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथे गुढीपाडव्याच्या निमित्त देवाचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये आणि अडीवाचन करण्यात आले. यावर्षी पिकाची परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले, नववर्षाच्या मुहूर्तावर श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना अलंकारिक पोशाख परिधान करण्यात आले, देवाचे अलंकारिक रूप पाहण्यासाठी, देऊळवाड्यामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी दिनांक 18 रोजी अमावस्या निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम करून, मानकरी यांच्या हस्ते आणि पूजन करून मराठी महिन्यानुसार खरीप व रब्बी हंगामातील घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या बारा महिन्याच्या बारा व चार दिशांना चार आड्या लावल्या जातात, गुरुवारी दि. 19 रोजी गुढीपाडव्यानिमित्त पहाटे पाच वाजता महापूजा करून, मंदिर बंद करण्यात आले, सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले, व नववर्षानिमित्त भाविकांचे अभिषेक करण्यात आले, गावकरी व भाविकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी सात वाजता मंदिरात गुढी उभारण्यात आली, सकाळी साडेआठ वाजता देवाचे मानकरी, शिंगाटे, तरटे, बुरंगुले, भवान, वहटकर, सालकरी, गुरव तसेच मुळीक, गावचे मुकादम पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते अडीचे पूजन करून, अडी काढण्यात आली, अडी वाचनामध्ये चांगल्या मध्यम तसेच कोरडवाहू पिकांचा अहवाल सांगितला जातो, या वर्षी भुईमूग, हरभरा, गहू तसेच कडधान्य व मिरची कोथिंबीर ही पिके समाधानकारक, बाजरीचे पीक मध्यम तर ज्वारीचे पीक कोरडे असल्याचे सांगितले, यावेळी ग्राम पुरोहित थिटे बंधूंनी मंत्रोच्चार करून, आढीवाचन केल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन धुमाळ यांनी सांगितले. गावच्या चावडीवर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये देवस्थान ट्रस्टच्या कामाचा वार्षिक अहवाल देवस्थान ट्रस्टचे वतीने अमोल आप्पासो धुमाळ यांनी मांडला. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते ,अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments