Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये 1,283 शेतकरी बाधित ;तर 3,89 हेक्टर वरील पिकांचे नुकसान, गारपीट अवकाळी पावसाचा तडाखा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील दि. 18 रोजी सायंकाळच्या सुमारामध्ये वादळी वाऱ्यास मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली या अवकाळी नैसर्गिक आपत्तीमुळे उन्हाळी व रब्बी हंगामातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले 1,283 शेतकरी बाधित असून 3,89 हेक्टर वर पिकांचे नुकसान झाले, गारपीट व अवकाळी पावसाचा तडाका शेतकऱ्यांना बसल्यामुळे, शेतकऱ्यांचे अर्थकारणच पूर्णपणे कोलमडून पडलेले आहे ,या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे व सभापती अमित झेंडे यांनी गुरुवारी दि. 19 रोजी बाधित क्षेत्राची पाहणी केली माळशिरस,पिसर्वे,नायगाव, राजुरी, रिसेपिसे, पोंढे, मावडी, पिंपरी, मावडी सुपे, हंबरवाडी आणि शेड करमळा परिसरामध्ये बुधवारी दि. 18 रोजी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली यामुळे होणारी पिके व फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते ,नुकसानी बाबत लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी अशी दखल घेतली, यावेळी इंगळे व झेंडे यांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याशी चर्चा करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळण्याची शक्यता आहे, नुकसानीचा आकडा वाढणार का? तालुका कृषी अधिकारीश्रीधर चव्हाण यांनी सांगितले की ,हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून, प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे ,सध्या कृषी विभागाच्या पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी व पंचनामे सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments