पुरंदर तालुक्यातील सासवड मधील ग्राहकांना घरपोच मिळणार सिलेंडर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर मधील प्रवीण गॅस एजन्सीने ग्राहकांच्या सुविधेसाठी गॅस केंद्रावर होणारी गर्दी आणि विस्कळीत होणारी वितरण व्यवस्था यामुळे, गुरुवारपासून दि. 19 पासून" गुढीपाडवा निमित्त "केंद्रावरील गॅस वितरण बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता ग्राहकांना केवळ ऑनलाइन बुकिंग द्वारे घरपोच सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक नितीन बोरा यांनी दिली आहे. शहरामध्ये 10,000 आणि परिसरामध्ये सुमारे 32,000 गॅस ग्राहक असून रोज सरासरी 6,00 सिलेंडरची मागणी होत आहे. एजन्सीकडे पुरेसा साठा उपलब्ध असूनही, ग्राहक केवळ भीतीपोटी केंद्रावर येऊन रांगा लावत आहेत, त्यामुळे विस्कळीत झालेल्या रांगा या त्या ठिकाणी गॅस मिळत नाही ,अशा भावना या पुरंदर तालुक्यात पसरवल्या जात आहेत, परंतु भीती पोटी ग्राहक हे सासवडच्या एचपी गॅस च्या ऑफिसवर येऊन रांगा लावल्याने ,त्या ठिकाणी गॅस मिळत नाही अशा भावना निर्माण झालेल्या आहेत, तर ही शंका असणारी या ठिकाणी त्यासाठी आज गुरुवारपासून "गुढीपाडवा निमित्त" गॅस वितरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती प्रतीक भंडारी मालक प्रवीण गॅस एजन्सीचे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments