Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथे भीषण अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावच्या दाते मळा बस स्टॉप जवळ रविवारी (दि. 14) दुपारी एक वाजताच्या सुमारास ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून, जितेंद्र शशिकांत पवार (वय 25) राहणार भादवडे ता. खंडाळा जिल्हा सातारा असे अपघातामधील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तो मोटरसायकल वरून, सासवडकडे जात असताना, अपघात झाला, ट्रक चालक विजय पांडुरंग कदम (वय 55) रा. दरुज ता. खटाव जिल्हा सातारा याच्या बेफरवाईमुळे, भरधाव वेगाने ट्रक चालवल्याने प्राथमिक निष्कर्ष पोलिसांच्या तपासामध्ये असे पुढे आले आहे, ट्रक सासवड कडून वीर बाजूकडे भरधाव वेगाने जाताना समोरून, येणाऱ्या जितेंद्रच्या मोटरसायकलला धडक बसली, यामध्ये जितेंद्र यांना गंभीर दुखापत होऊन, त्यांचा जागीच मृत्यू झाला, अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक नवनाथ कामठे हे ग्रामीण रुग्णालय सासवड येथे पोहोचले असता, डॉक्टरांनी तपासून जितेंद्रला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सासवड पोलिसात केली असून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,या संदर्भात सासवड ठाणे अमलदार दत्ता शेगर यांनी हा संबंधित गुन्हा दाखल करून घेतला, तर ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांबळे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments