आषाढ वद्य अमावस्येनिमित्त श्रीनाथांच्या मंदिरात विर येथे भाविकांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी: गुरुवार दि. २४जुलै रोजी आषाढ अमावस्येनिमित्त भाविकांनी वीर येथे श्रीनाथांच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. पहाटे ४ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम, दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. आजच्या महाप्रसादाचे आयोजन सर्वश्री विठ्ठलशेठ गणपतराव धुमाळ, रामदादा धुमाळ, सुशीलकुमार जाधव यांचेमार्फत करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टमार्फत स्वच्छ पाणी, दर्शनबारी, जादा होमगार्ड, कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हा.चेअरमन अमोल आ. धुमाळ, सुनील धुमाळ, विराज धुमाळ,सचिव काशिनाथ धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त श्रीकांत थिटे, बाळासो समगीर, प्रमिला देशमुख, अलका जाधव, जयवंत सोनवणे आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments