Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघीरे महाविद्यालयात अजित स्पर्धेचे आयोजन सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट आयोजित अजित स्पर्धा परीक्षा या उपक्रमामध्ये वाघिरे महाविद्यालय सासवडच्या 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी सुसंस्कृत व ज्ञानसमृद्ध व्हावेत, या उद्देशाने घेण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन आनंदराव पवार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले असून, परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धा परीक्षेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सामान्यज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी अशा विविध विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश परीक्षेत करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सामाजिक जाणीवेचे प्रतिबिंब या उपक्रमात पाहायला मिळाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतल्या जाणाऱ्या या प्रकारच्या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत दुसऱ्याचे होते असल्याचे मत स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा. डॉ. स्वप्निल जगताप यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी, डॉ. तुषार घोरपडे, प्रा.डॉ. नरेंद्र कांबळे, प्रा. हरीश भूतकर, प्रा. पूनम काळे, प्रा. सुनिता कोलते l यांचे विशेष सहकार्य लाभले. परीक्षा विभाग अधिकारी प्रा.अनिल झोळ, दादा सावंत, प्रमोद भोसले, नारायण यादव, अप्पा खोमणे, अंकुश धायगुडे, संतोष लोणकर, प्रा. स्वाती जाधव, प्रा. शाहीण पठाण, प्रा. सदुंबरे , प्रा. पिसाळ, प्रा. वाघमारे, प्रा. मनोज बोदरे यांनी या परीक्षेचे पर्यवेक्षक् म्हणून काम केले.

Post a Comment

0 Comments