पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी व जेजुरी गावाच्या हद्दीत अवैध गावठी दारू भट्टीवर; निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुरंदर कार्यालयाकडून धडक कारवाई सासवड प्रतिनिधी: राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, पुणे विभाग पुणे यांच्या पथकाने 22 जुलै 2025 रोजी पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गाव हद्दीतील टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत तसेच गावाच्या हद्दीत बारामती जेजुरी रोड लगत, ओढ्याच्या काठी दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या भट्टीवर छापे मारले, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, पुणे विभाग पुणे नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग पुणे यांच्या पथकाने 22 जुलै 2025 रोजी पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावातील टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत तसेच जेजुरी गावाच्या हद्दीत बारामती जेजुरी रोड लगत ओढेया काठी दोन ठिकाणयाच्या त्यामध्ये 5550 लिटर रसायन, 18 55 लिटर अवैध गावठी हातभट्टी दारू व निर्मिती साहित्य असा एकूण अंदाजे रुपये 3, 94, 500 किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या ठिकाणी गावठी दारूभट्टी तयार करणाऱ्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 ब क नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यापुढे अवैध त्यांच्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती व वाहतूक विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने सातत्याने छापे मारण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पदक पुणे कार्यालयाकडून, कळविण्यात आले आहे सदरची कारवाई विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते, शशिकांत भाट, संदीप सुर्वे व ऋतिक कोळपे यांनी केली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते करीत आहेत. पुणे शहरातील नागरिकांना अवैध दारू निर्मिती वाहतूक व विक्री व्यवसायाशी संबंधित माहिती असल्यास, त्यांनी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग पुणे यांची कार्यालयाशी संपर्क साधावा ,असे आव्हान निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकानवये केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments