पुरंदर तालुक्यातील माहूर विद्यालयांमध्ये 'एक पेड मा के नाम' अंतर्गत रोपे वाटप सासवड प्रतिनिधी: माहूर (ता. पुरंदर) माध्यमिक विद्यालयात 'एक पेड मा के नाम' या योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण परिषद सासवड यांच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप वाटप करण्यात आले. यामध्ये पेरू, आवळा, काजू, बदाम, जांभूळ यासारख्या रोपांचा समावेश होता. वन परिमंडल अधिकारी माधुरी जगताप या माहूर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून, त्यांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेले रोप आपल्या शेतामध्ये आईच्या नावाने लावण्यास सांगितले, तसेच रोप लावताना आपल्या आईबरोबर एक सेल्फी फोटो काढण्यास सांगितला. मुख्याध्यापक हनुमंत पवार म्हणाले की, माजी विद्यार्थी विद्यालयात येऊन चौकशी करतात, विघालयाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व भौतिक सुविधांच्या बाबतीत विचारपूस करून, विघालयाला सहकार्य करतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेच विद्यार्थी या विघयालयातून घडत राहो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी वन परिमंडळ अधिकारी रेश्मा मिलिंद गायकवाड उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण विभाग प्रमुख रामचंद्र जगताप यांनी केले होते. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामप्रभू पेठकर यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments