पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील शेतकरी कच-याच्या समस्येने त्रस्त ..भातखाचरांच्या झाल्या कचराकुंड्या; भातलावणी करताना शेतकरी त्रस्त .. सासवड प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभुमी किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र श्री.क्षेत्र नारायणपूर -पोखर ग्रामपंचायतकडे व देवस्थानकडे कोणतेही घनकचरा व्यवस्थापन नसल्याने कचरा ओढ्याच्या पात्रात टाकला जातो.दरवर्षी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि पाणी ओढ्यालगत असलेल्या भातखाचरांमध्ये कच-यासह साचून राहते.नारायणपूर येथे दररोज हजारो भाविक येत असतात. याठिकाणी हार, फुले, भाजी विक्रेते ,हाॅटेल व्यावसायीक यांच्याकडून होणारा कचरा ऊघड्यावरच टाकला जातो. भातलावणीच्या वेळी रोपे टाकताना, चिखलणी व मशागत करताना प्लॅस्टीकच्या मोकळ्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, काचेच्या बाटल्या, सांडपाणी, हार, फुले हाॅटेलचा ओला कचरा ओढ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असल्याने प्रदुषण होत आहे.त्यामुळे १५ ते २० शेतक-यांना भातशेती करणे अवघड झाले आहे. चिखलणी करताना पाण्याबरोबर वाहून आलेले कपडे,चादर, गोधड्या ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून ट्रॅक्टर चिखलात रूतून बसतात.भातलावणी करणारे शेतमजूर तसेच इर्जिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी या ठिकाणच्या भातलावणीस हातापायास काचा व नारळाच्या करवंट्या व तत्सम वस्तू लागून जखमी होण्याच्या भितीने नकार देतात.त्यामुळे स्थानिक शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थानिक शेतकरी तुळशीदास बोरकर, भुजंग बोरकर, सदानंद बोरकर, चांगदेव बोरकर, रामभाऊ बोरकर, राहूल गायकवाड, बाजीराव बोरकर,रामचंद्र बोरकर या शेतक-यांच्या जमीनी सर्वाधिक बाधीत असून, यांच्या भात खाचरात घनकचरा व सांडपाणी दुर्गंधीने डासांची ऊत्पत्ती वाढत असल्याने ग्रामस्थ व नारायणपूर ला येणा-या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सद्य स्थितीत श्री.क्षेत्र नारायणपूर येथे होणारा कचरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजंदारी कामगारांकडून ऊचलला जातो. कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे स्व:तची अथवा सरकारी जागा उपलब्ध नाही. देवस्थानच्या जागेत मोठा खड्डा घेवून त्यामध्ये कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायतीस अल्प ऊत्पन्न असल्याने याबाबतचा खर्च ग्रामपंचायतीस परवडत नाही. तसेच कचरा संकलनासाठी घंटागाडीची कामगारांची गरज असून, याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच प्रदिप बोरकर यांनी सांगीतले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments