Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात लमपी चर्मरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना; जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत: डॉ. अस्मिता साताळकर सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील लमपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहीम तसेच लमपी रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत, असे पुरंदर तालुक्याच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अस्मिता साताळकर यांनी सांगितले. सध्या तरी तालुक्यात जनावरांमध्ये लमपी चर्मरोग या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून, आल्याने या रोगाचे नियंत्रण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक घेऊन, लमपी चर्म रोगाचा प्रतिबंधात्मक सूचना बैठकीत मिळाल्यामुळे, त्यावर उपाययोजना, सर्वे करून, औषधोपचार, लसीकरण केले जात आहे.यासाठी पुरंदर तालुक्यात डॉक्टरचा तुटवडा आहे, परंतु त्यावर तोडगा काढून, लसीकरण, औषधोपचार केले जात आहेत. त्यामुळे उपचारानंतर बहुतांश जनावरे तालुक्यात बरी होत आहेत. प्रतिबंधात्मक लसीकरण गोट फॉक्स लसीद्वारे उत्तरकाशी ट्रेन) करण्यात येते. सध्या तरी पुरंदर तालुक्यात प्रागतीक बाधित जनावरे -102 असून, त्यातील लसीकरण प्रागतिक बरी झालेली जनावरे -98 आहेत, तर फक्त पुरंदर तालुक्यात बाधित जनावरे 4 राहिले असून, त्यावर सुद्धा औषधोपचार , लसीकरण करण्याचे काम सध्या चालू आहे. ते सुद्धा लवकरात लवकर बरी होतील, अशी माहिती पुरंदर तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अस्मिता साताळकर यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments