Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिका शिक्षण मंडळातील सेवकांचे पगार वेळेवर मिळत नाहीत; त्यासाठी उपोषणाचा इशारा सासवड प्रतिनिधी: गेली दोन वर्ष झाली नगरपालिका व महानगरपालिका शिक्षण विभागातील शिक्षक वर्ग व शिक्षकेतर वर्ग सेवानिवृत्त वर्ग यांचे वेतन वेळेत मिळत नाही, शासनाकडून 1 तारखेला पगार करावीत असे, असून देखील त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. केव्हाही सर्वांचे वेतन करतात, यामागे काय हेतू आहे, हे समजून येत नाही, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे अनुदान वेळेत देतात, जिल्हा परिषद व इतर कार्यालय याचे पगार लवकर होतात, मग नगरपालिका शिक्षण विभागावर अन्याय का? होत आहे ,सध्या स्थितीत सुधारणा झाली नाही तर, सर्व शिक्षक शिक्षकेतर पेन्शन धारक आता उपोषणासाठी बसणार आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षका क्रमाने, नगरपालिकेच्या शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर ऑनलाईन व्हावे, अशी मागणी नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ शाखा पुणे जिल्हा यांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील तसेच पुणे विभागातील नगरपालिकेंच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे व शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही, त्यामुळे शिक्षक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना मानसिक सामाजिक व आर्थिक तणावातून जावे लागत आहे .उपसंचालक कार्यालयातून वेळेवर अनुदान उपलब्ध करून, दिले जात नाही व त्यानंतरही नगरपालिका स्तरावर आणखी विलंब होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुढच्या 25 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते, वेतनास विलंब झाल्यामुळे गृह कर्ज ,मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, व इतर कर्जांचे हप्ते वेळेवर परत होत नाहीत. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दवाखान्याच्या खर्च व कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन हे ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या खात्यावर जमा होते. त्याप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे देखील थेट त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात यावे अशी, आग्रहाची मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments