Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर विमानतळ संदर्भात प्रकल्पग्रस्तांचे त्याच गावांमध्ये पुनर्वसन करण्याचा सरकारचा प्रयत्न सासवड प्रतिनिधी: पुरंदर विमानतळासाठीच्या गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे, त्याच गावात अथवा प्रकल्पग्रस्ताने मागणी केलेल्या गावातच त्यांची पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने विमानतळाचे आजूबाजूच्या परिसरातील भूखंडाचे आरेखन, आराखडा तयार करण्यात येणार आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या विमानतळासाठी सुमारे 2हजार 673 हेक्टर जमिनीची भूसंपादन करण्यात येणार आहे. या सात गावात मिळून, 13 हजार 300 शेतकरी बाधित होणार आहेत. भूसंपादनाचे काम 2019 च्या नुसार होणार आहे, त्यामुळे बाधितांना काय सुविधा आणि फायदे देता येतील, याबाबतची परिपत्रक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून काढण्यात आले आहे. त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाची सहमती दिली तर त्यांना दहा टक्के विकसित भूखंड देताना ज्या गावचे ते रहिवासी आहेत, त्याच गावात त्यांना तो भूखंड देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, ते गाव सोडून त्यांनी जर अन्य गावात हा भूखंड मागितला तर तेथे त्यांना तो उपलब्ध करून, देण्याबाबतचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे असे सरकारकडून सुचित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments