वाघिरे महाविद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय सासवडच्या खेळाडूंनी बुधवार दि. 3 सप्टेंबर रोजी जवळार्जुन ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत वाघिरे महाविद्यालयाच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात घवघवीत हे संपादन केले. उच्च माध्यमिक विभागातील 19 वर्षीय मुले या वयोगटातील खेळाडूंनी दैदित्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि वाघिरे महाविद्यालयाचा संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य प्रा. राजेश देशमुख, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. संजय लांडगे, जुनियर विभागाचे फिजिकल डायरेक्टर प्रा. विकास मुजुमले, प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय स्टाफ,, विद्यार्थी वर्ग इत्यादींनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा अमर होळकर, प्रा.प्रताप किर्दात, प्रा श्रीनिवास खेत्रे ,घारे मॅडम, शेख मॅडम ,पावडे मॅडम कोंढेकर मॅडम, इंगळे मॅडम, खिराप मॅडम उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments