Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड परिसरातील चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले अथर्वशीर्ष पठण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीकमुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड प्रशालेतील प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील एकूण २४० विद्यार्थांनी अनुक्रमे कऱ्हाबाई गणेशोत्सव मंडळ, आचार्य अत्रे गणेशोत्सव मंडळ, सावतामाळी मंडळ , श्रीमंत नेताजी गणेशोत्सव मंडळ या चार ठिकाणी जाऊन सर्व अथर्वशीर्षाची आवर्तने,गणपतीस्तोत्राचे पठण, बालचमुंची श्लोक स्पर्धा व सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम उत्साहात सादर केले. तसेच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... या गजरामुळे सर्व सासवड परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे शिक्षक भाऊसो येळे व अश्विनी खळदकर यांनी केले. यामध्ये त्यांना स्वाती पांढरे,निकिता होले ,रुचिरा गार्डी, प्रतिक्षा बोळगे, गीता पुरंदरे,नीता जगताप ,अक्षदा शिंदे, नितीन ठोंबरे,अंकिता कुंजीर,पूनम दामोदर, सुप्रिया डगळे, व रेश्मा जगताप यांनी सहकार्य केले. या उपक्रमाला माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर व पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सतत करत असते. व यापुढे देखील असेच सामाजिक आणि भावनिक कार्य अविरत करत राहील असे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांगितले.चारही मंडळांकडून मुख्याध्यापिका,शिक्षक यांचे श्री गणेशाची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.या उपक्रमाचे शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे व महामात्र प्रा. सुधीर भोसले यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments