Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सुरेखा कामठे केंद्रप्रमुख पदी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिवरी (ता. पुरंदर) येथील रहिवासी व कोडीत येथील प्रभारी मुख्याध्यापक सुरेखा भरत कामठे यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आहे, त्याची वाळूंज केंद्र प्रमुख पदी निवड झाली असून, कामठे यांचा शैक्षणिक संघटनात्मक अनुभव पाहता, त्यांच्या नेतृत्वात केंद्राच्या कामकाजाला नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एम. बी. ए. बी. एड पदवीधर असे कामठे यांचे शिक्षण झाले असून, त्यांनी गेली पस्तीस वर्षे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे, कामठे यांना गुणवंत शिक्षक, तसेच समता कृती प्रतिष्ठानचा ही पुरस्कार मिळाला असून ,त्यांनी पदवी तर शिक्षक संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदावरही काम केले आहे. संघटनात्मक कार्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका बजावलेली त्यांनी आहे.

Post a Comment

0 Comments