Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी बनवले अडीच हजार बीज गोळे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माझी वसुंधरा अभियानांतर्गत सासवड( ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि नगरपरिषद यांच्या वतीने, विघालयात बीज गोळे कार्यशाळा पार पडली. या उपक्रमामध्ये सुमारे 250 विद्यार्थ्यांनी अडीच हजार बीज गोळे तयार केले. यासाठी स्काउटर शितल बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहावीच्या विद्यार्थ्यांनी आंबा, चिंच, सीताफळ अशा विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया वापरल्या, नगर परिषदेचे शहर समन्वयक राम कारंडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सेवानिवृत्त आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी माजी वसुंधरा अभियानाचे महत्त्व सांगितले, तर आरोग्य निरीक्षक प्रकाश तुळशी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण बीज संवर्धन आणि पर्यावरण पूरक जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य रेणुका सिंग मर्चंट यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments