Hot Posts

6/recent/ticker-posts

विमानतळासाठी 56% भुसंपादनाची संमती पुरंदर मधील वगळलेल्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावरील शिके काढले जाणारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी एका आठवड्यात तब्बल 56% जमीन देण्या संदर्भात सहमती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे, 26 ऑगस्ट पासून, प्रशासनांनी समिती घेण्यास सुरुवात केली असून, फक्त पाच दिवसात तब्बल 1580 एकर जमिनीच्या संपादनात शेतकऱ्यांनी होकार दिला आहे ,यात शेतकऱ्यांची संख्या तब्बल 1310 आहे, एकूण क्षेत्राच्या तुलनेत 56% क्षेत्रासाठी सहमती मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे, संमतीसाठी 18 सप्टेंबर नंतर मुदत वाढ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे, सुरुवातीला विमानतळासाठी सुमारे सात हजार एकर भु संपादन करण्याचे ठरले होते, त्याला शेतकऱ्यांनी मोठा विरोध झाला होता चार महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूसंपादन क्षेत्रात कपात करण्याचा निर्णय घेतला सुमारे चार हजार एकर क्षेत्र कमी करून, आता विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे, सुरुवातीला या सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के मारण्यात आले होते, भूसंपादन प्रक्रिया संपादन मंडळाच्या नावाचे शिक्के मारले जातात, त्यामुळे सुरुवातीला सहमतीने व नंतर सक्तीने नेहमी घेतली जाते परिणामी शिके बसल्यानंतर त्या जमिनीचे इतरत्र व्यवहार करणे शक्य होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, जमिनीचे क्षेत्र कमी केल्यानंतर उर्वरित चार हजार एकर जमिनीवरील शिके करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, याबाबत डुडी म्हणाले विमानतळासाठी 7000 एकर जमीन घेतली जाईल, असा जाणीवपूर्वक संभ्रम काही शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात होता, प्रत्यक्षात केवळ तीन हजार एकर जमीनच संपादित केली जाईल, उर्वरित जमीन विमानतळासाठी घेतली जाणार नसल्याने, त्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के काढले जाणार आहेत ,त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल मात्र शेतकरी विमानतळासाठी जमीन देण्यास तयार असल्यासच, ती घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, संपादनाला विरोध करणाऱ्यापैकी काही जण एजंट असल्याचाही संशय आहे. शेतकऱ्याकडून कमी भावात जमीन घेऊन, ती इतरत्र विकण्यास डाव असल्याचे समजते, काहींनी गुंतवणूक आधाराकडून पैसेही घेतले ची माहिती मिळाली आहे.शेतकऱ्यांनी अशा एजंटांच्या भूलथाप्यांना बळी पडू नये, असे आव्हानही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments