Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी सावित्रीच्या लेकीकडून वडिलांचे अंत्यसंस्कार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरोगामी विचाराचा वारसा सांगणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आणि कृतीचा वारसा जपत चार मुलींनी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले ,पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील दिनकर हरिभाऊ कामठे (वय 77) यांचे 77 व्या वर्षी अल्पशा आजारांनी निधन झाले, त्यांना अत्यं विधीसाठी त्यांच्या मूळ गावी कुंभारवळण येथे आणण्यात आले असता, सुरुवातीला आपल्या समाजातील पुरुष प्रधान मानसिकतेनुसार, त्यांना मुलगा नसल्याने, जावयाने अत्यसंस्कार करावेत ,अशी चर्चा झाली मात्र दिनकर कामठे यांची थोरली मुलगी मिना शेडकर यांनी पिंपरी गावाच्या माजी सरपंच असून, गेली अनेक वर्ष महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम या संस्थेच्या सहसंयोजक म्हणून महिला सक्षमीकरण करता काम करीत आहेत, त्यांनी आपण स्वतःच हे सर्व विधी करणार असल्याचे, स्पष्ट केले. त्यांचे पती कृषी भूषण महादेव शेडकर यांनी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर मिना शेडकर यांनी स्वतंत्र्य अंत्ययात्रेत मडके धरले स्मशानभूमीत मिना यांनीच अग्नी दिला, तशेच मोहिनी घिसरे, रोहिणी धनावडे, प्रिया बोरकर या इतर तीन बहिणींच्या साथीने उर्वरित विधी केले, याबाबत उपस्थित लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या विषमतेवर आधारित पितृ सत्तेला धक्का देत मिना शेडकर आणि त्यांच्या तीन बहिणींनी केवळ पुरंदर तालुक्यातीलच नव्हे तर समाजातील सर्व महिलांसमोर एक आगळा वेगळा आदर्श उभा करत, श्री पुरुष समानतेच्या वाटेवर कृतिशील पाऊल टाकले हे मात्र नक्की आहेच.

Post a Comment

0 Comments