Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवडमधील 28 गुंड तडीपार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गणेश विसर्जन चार दिवसांवर आले असताना, त्या पार्श्वभूमीवर सासवड शहर पोलिसांनी दक्षता घेतली आहे, शहरातील दोन व त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 28 गुन्हेगार प्रवृत्त तयार करण्यात तीन दिवसासाठी शहरातून हद्दपार केले आहे, गणेशोत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज झालेले असून, शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ झाल्याने छावणीचे स्वरूप आले आहे. शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असून, सर्व मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती धारकांचे हद्दपार प्रस्ताव भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे सादर करीत मंजुरी घेतली शुक्रवार दि. 5 ते रविवार दि. 7 सप्टेंबर दरम्यान, 28 जण तरी पार करण्यात आले आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत ,सासवड शहरात गणेशोत्सव शांततेत साजरी व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे, शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, 7 पोलीस अधिकारी, ५५ पोलीस कर्मचारी, 25 होमगार्ड यांच्यामुळे छावणीचे स्वरूप आलेले आहे. गणेशोत्सव मिरवणुकीत शहरात शांतता सुरवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, 28 गुन्हेगार प्रवृत्ती धारकांना तीन दिवस शहरातून हद्दपार केले आहे. गुन्हेगार प्रवृत्तीवर पोलिसांची करडी नजर आहे, संशयास्पद प्रकार दिसून आल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी. ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.

Post a Comment

0 Comments