Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी आरक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाज एकवटला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ओबीसी मध्ये पहिलीच साडेतीनशे जाती आहेत, तर या जातींना अजून पुरेशी प्रतिनिधी मिळालेली नाही, त्यात पुन्हा एक मोठा मराठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल, तर त्यासाठी कुणबी दाखले घेऊन, मराठा ओबीसी मध्ये आले तर भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी वर अन्याय होणार आहे, याबाबतचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्याच्या प्रक्रिया या सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार सासवड येथे तहसीलदार विक्रम राजपूत यांना ओबीसीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष निलम होले, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गिरमे, ओबीसी सेल अध्यक्ष संजय टिळेकर, उपाध्यक्ष समता परिषद किसनराव वाघोले, यांनी विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शितल बनकर, सागर जगताप, मनोज मेत्रे, स्वाती हिरवे, मंगल म्हेत्रे, प्रिया जगताप, सचिन भोंगळे, योगेश जांभुळकर, संतोष गिरमे, आबा भोंगळे, ताजुद्दीन शेख, नितीन राऊत ,विद्या टळेकर, विजय गिरमे, किरण कुंभार, प्रल्हाद शिंदे, विजय राऊत, मोबीन बागवान, अजित गायकवाड, अतुल लांडगे, सोमनाथ दुधाळ, नितीन भोंगळे, रोहित इनामके, विजय नवले, एडवोकेट स्वाती चौखंडे, विशाल कादबाणे, एडवोकेट सचिन कदम आदी उपस्थित होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठ्यांच्या पेक्षा 10 पट ओबीसी रस्त्यावर येण्याच्या तयारीत असल्याचे किसनराव वाघोले यांनी सांगितले. किशोर वचकल यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रकांत हिवरकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments