सासवड शहरात गणेश उत्सवाचे औचित्य साधून डेंगू /हिवताप /चिकुनगुण्या आजार प्रतिरोध जनजागृती अभियान राबविले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: डेंगू/हिवताप /चिकुनगुण्या आजार प्रतिरोध अभियानास सासवड नगर परिषद व आरोग्य विभाग पंचायत समिती पुरंदर यांचे मार्फत डॉ.कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद,अपर्णा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी पुणे, व विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.या अभियानाचा उद्देश सात रोगास आळा घालणे तसेच स्वच्छते संबंधी प्रचार प्रसार व प्रसिद्धी करणे हा आहे. ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेचे विध्यार्थी यांच्या सहभागाने जनतेला निरोगी सवयी अंगी कारण्यास तसेच स्वच्छता स्वीकारण्यास प्रवृत्त करून जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्या अनुषंगाने मोहीम हाती घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रकाश तुळशी आरोग्य विभाग प्रमुख सासवड, प्रकाश चवरे तालुका विस्तार अधिकारी, राम कारंडे शहर समन्वयक व फिरोज तांबोळी संतोष भोसले, ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. डी. ढोबळे सर व सी. डी. ढोबळे सर तसेच ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेच्या प्राचार्या सोनाली कामठे मॅडम,कु. श्रुतिका पवार मॅडम तसेच संस्थेतील विध्यार्थी आदी उपस्थित होते. प्रकाश चवरे यांनी जलजन्य व कीटकजन्य आजाराचे महत्त्व नमूद करून डेंगू/हिवताप /चिकुनगुण्या आजाराची सर्वसाधारण माहिती रोग लक्षणे व उपचार याची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून निरुपयोगी टायर नारळाच्या करवंट्या मोकळे डबे बाटल्या इ. निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी मच्छरदाणीचा वापर करावा आपल्या घराजवळील डास उत्पत्ती स्थानके शोधून काढून नष्ट करावे व गटारी वाहती करावीत पाणी साठ्याच्या ठिकाणी रॉकेल, जळके ऑइल यांचा वापर करावा व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात आपल्या घराच्या मोठ्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंगू आजारापासून स्वतःचे व समाजाचे संरक्षण करण्या आव्हान करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments