संजय वामनराव धुमाळ उपक्रमशील व गुणवत्ता शिक्षक म्हणून गौरव सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे 4 सप्टेंबर 2025 गुणवत्ता मुख्याध्यापक शिक्षण पुरस्कार, वितरण सोहळा शिक्षण अधिकारी माध्यमिक भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, आजच्या युगामध्ये शिक्षक आणि अद्यावत राहणे ही काळाची गरज असून, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात केला पाहिजे व विद्यार्थ्यांना अद्यावत ठेवले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते नंदकुमार सागर, सुधाकर जगदाळे, सरपंच शोभा दलवी, तानाजी घारे, सुनील लोणकर,ए.टी.माने,बापू मुळीक, शब्बीर शेख, दिपक फडतरे, दिपाश्री वाणी, भानुकाका जगताप, सचिन पठारे, रामभाऊ झेंडे, संतोष जगताप, संजय धुमाळ, संदीप देवकर, भैय्यासाहेब खैरे, बाबुराव गायकवाड, मा. अध्यक्ष शिक्षक लोकशाही आघाडी पुरंदर, शांताराम दळवी व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार प्रसंगी अशोक रामा चव्हाण मुख्याध्यापक कोळीविहीरे, सतीश रामदास कुमदाले कातोबा हायस्कूल दिवे, श्रीमंत देशराज यादव सद्गुरु नारायण महाराज माध्यमिक विद्यालय नारायणपूर, भानुदास मारुती कटके पुरंदर हायस्कूल व जूनियर कॉलेज सासवड, दत्तात्रय बाबुराव वायसे राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, प्रशांत रमेश जगताप न्यू इंग्लिश स्कूल जेऊर, सुनंदा मोरेश्वर टकले केदारेश्वर विद्यालय कालदरी, मनोज कुमार दौलतराव कदम बाल सिद्धनाथ विद्यालय बेलसर, अश्विनी समीर कामठे वाघिरे हायस्कूल सासवड, शबाना हसन मनियार ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे, सुदाम ज्ञानदेव गायकवाड महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे, प्रशांत धोंडीबा धेंडे निवासी हायस्कूल, दत्तात्रेय एकनाथ पवार नीरा शाळा नंबर एक, रवींद्र तुकाराम कुंजीर हिवरे शाळा, छाया नामदेव कारकर शाळा माहूर, संजय वामनराव धुमाळ तोंडल, वर्षा प्रशांत माकर धनगर शाळा वाल्हे, सुवर्णा गोरख खेडेकर मावडी सुपे, मोहनलाल ज्ञानेश्वर निगडे न्यू इंग्लिश स्कूल जवळाअर्जुन, उत्तम गेनबा लकडे कृषी औद्योगिक विद्यालय चाबली, अण्णा सांगप्पा लोंढे भैरवनाथ विद्यालय वनपुरी, नितीन किसन काळे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे या 22 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भोसले सर यांनी केले व आभार दत्तात्रय गायकवाड यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments