Hot Posts

6/recent/ticker-posts

संघटन करून टोळीने गुन्हे करणाऱ्या आरोपी यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाणे यांच्याकडून बीएनएसएस चा 111 चा दणका सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पान मसाला तसेच गुटखा वाहतूक होणार असल्याबाबत ची खबर राजगडचे पोलिस अंमलदार यांचे कडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने जेजुरी नाका सासवड येथे यशस्वीरीत्या नाकाबंदी करून, एकूण 11,65,600/- इतक्या किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सासवड पोलीस ठाणे यांच्याकडून सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे पकडण्यात आलेला होता, दाखल गुन्ह्यात 1) सिद्धेश्वर उत्तम काळे (वय 17 वर्षे,) चालक, राहणार सांगली 2) चेतन पांडुरंग खांडेकर, (वय 22 वर्षे,) 3) बाबू धुळा काळे,( वय 23 )राहणार सांगली यांच्या विरोधात भारतीय न्याय जनता कलम 123, 223,274,275, 3(5 ) सह अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2),27(3) 30 (2),59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन, वर नमूद आरोपीत हे बऱ्याच वर्षापासून, इतर आरोपीत यांच्यासोबत संघटित टोळी सक्रिय करून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न करून, त्यांच्या विरोधात संघटित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करणे व नियंत्रण ठेवणे या कायद्याअंतर्गत भारतीय न्याय सहिंता कलम 111 हे वाढीव कलम लावणे बाबत प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सादर करण्यात आला होता, त्यास माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी परवानगी दिलेली आहे.अशी माहिती ऋषींकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments