Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रंथलेखन हे समृद्ध ज्ञानाचे प्रतीक – विजय कोलते सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ग्रंथलेखन हे समृद्ध ज्ञानाचे प्रतीक असून, अभ्यासपूर्ण लेखन ही समाजासाठी मौल्यवान ठेवा ठरते,” अशा शब्दांत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते,यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रसंग होता शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांच्या दोन ग्रंथांच्या प्रकाशनाचा. या समारंभात संजीवनी मराठे यांची कविता : संदर्भ आणि शोध व संजीवनी मराठे यांचे बालसाहित्य : आकलन आणि मूल्यमापन या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना कोलते यांनी प्रा. कोळेकर यांच्या संतसाहित्यासह विविध विषयांवरील लेखनशैलीची प्रशंसा केली. “कोळेकर सरांचे लेखन हे विद्वत्तेचे व साहित्यप्रेमाचे जिवंत उदाहरण आहे. ते खऱ्या अर्थाने ‘साहित्याचे लेणं ’ आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले. प्रा. कोळेकर यांनी ग्रंथलेखनामागील पार्श्वभूमी उलगडत सांगितले की, “हे लिखाण करण्यासाठी मला प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांच्याकडून मिळाली.” समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिरीष लांडगे, संस्थेचे सचिव शांताराम पोमण, भिगवण कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक आप्पा मेमाणे, प्रा. डॉ. नारायण टाक आदी मान्यवरांनी प्रा. कोळेकर यांच्या साहित्यप्रवासाबद्दल अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. सोहळ्याला संस्थेचे सहसचिव बंडूकाका जगताप , महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे, श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, प्रा. संदीप टिळेकर, प्रा. केशव काकडे, संतोषआबा काकडे, संदीप इनामके, अमोल बेलसरे, संजय काटकर, कवी हनुमंत चांदगुडे, अनिल कदम, बिभीशन जाधव, सचिन पेशवे, ज्येष्ठ पत्रकार बाळासो काळे, नितीन राऊत, मोहन बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने सासवड , जेजुरी परिसरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा अतुल चौरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ कल्पना रोकडे यांनी मानले . ॲड दिलीप निरगुडे , सासवड यांनी ही सवॅ माहिती पतिनिधीला दिली आहे.

Post a Comment

0 Comments