Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये हिवरे या ठिकाणी गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ; जालिंदर कामठे यांची माहिती तर 22 जणांचा सन्मान होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील आदर्श गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वसंतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्यावतीने हिवरे येथे( दि. 4) रोजी गुरुवर्य नारायण महाराज विद्यालयामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन केलेची माहिती वसंत दादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी ही माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष हे पुरंदरचे तहसीलदार विक्रम सिंग राजपूत आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिवरेच्या सरपंच शोभा दळवी, उपसरपंच रामदास कुदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एम. के. गायकवाड असणार आहेत. यात मुख्याध्यापक 1, माध्यमिक शिक्षक 11, प्राथमिक शिक्षक 6, शिक्षकेतर कर्मचारी 4 असे 22 शिक्षकांचा सन्मान होणार आहे. यावर्षी महर्षी वाल्मीक विद्यालय कोळविहीरे मुख्याध्यापक अशोक चव्हाण, उपशिक्षक कातोबा हायस्कूल दिवे सतीश कुदळे, सद्गुरु नारायण महाराज विद्यालय नारायणपूर श्रीकांत यादव, पुरंदर हायस्कूल व जूनियर कॉलेज सासवड भानुदास कटके, राजुरी विद्यालय दत्तात्रेय वायसे, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर प्रशांत जगताप, श्री केदारेश्वर विद्यालय काळदरी सुनंदा टकले, बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर मनोज कुमार कदम, वाघीरे हायस्कूल सासवड अश्विनी कामठे, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे शबाना मनियार, महर्षी वाल्मिक वाल्हे सुदाम गायकवाड, शासकीय निवासी शाळा प्रशांत भेंडे, जिल्हा परिषद शिक्षक निरा नंबर एक दत्तात्रय पवार, हिवरे रवींद्र कुंजीर, माहूर छाया कारकर, तोंडल संजय धुमाळ, धनगर वस्ती वर्षा माकर, मावडी सुपे सुवर्णा खेडेकर ,शिक्षकेतर कर्मचारी न्यू इंग्लिश जवळाअर्जुन मोहन लालासो निगडे, कृषी औद्योगिक विद्यालय चाबली उत्तम लकडे, भैरवनाथ विद्यालय वनपुरी अण्णा लोंढे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे नितीन काळे, यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती वसंत दादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments