पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील दुचाकीच्या धडके मध्ये महिलेचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवरी (ता. पुरंदर) येथे दुचाकीच्या धडकेमध्ये ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला, नंदाबाई कृष्णा घाटे (वय 60) राहणार घिसरेवाडी भिवरी( ता. पुरंदर )असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि. 4 रात्री नऊच्या सुमारास नंदाबाई घाटे गणपतीच्या आरतीसाठी येत असताना, रस्ता ओलांडताना गराडे कडून भिवरीकडे भर धाव वेगात येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच 12 डब्ल्यूएस 16 89 या दुचाकी वरील चालकाने मागील बाजूने, त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घाटे यांना सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात मृत घाटे यांचे पुतणे शेखर रघुनाथ घाटे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला असून, अज्ञात मोटरसायकल चालका विरोधामध्ये सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सासवड पोलिसांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments