सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू पुरस्कार गणेश तोटे यांना प्रधान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालय रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने, देण्यात येणारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू पुरस्कार वाघिरे महाविघालय सासवड येथे राज्यशास्त्र प्रथम वर्षातील विद्यार्थी गणेश संजय तोटे यास राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ व खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वाघिरे महाविघालयात सासवड येथे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या गणेश तोटे ह्याचे मूळ गाव भिंगारी पनवेल असून, तो गेल्या आठ वर्षापासून फिटनेस जिम येथे पावर लिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी आतापर्यंत 12 वेळा राज्य अजिंक्य पद मिळवले आहे, याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित (दादा )पवार, मानद सचिव एडवोकेट संदीप कदम, सदस्य वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, क्रीडा शिक्षक प्रितम ओव्हाळ,यांनी गणेश तोटे यांचे अभिनंदन केले आहे. वाघीरे महाविद्यालयातील प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळेच, मला हे आत्ताचे गुणवंत खेळाडू पुरस्कार जो मिळालेला आहे त्यांचे सर्वश्री हे वाघिरे कॉलेजचे क्रीडा शिक्षक व प्राचार्य यांना जात आहे, अशी सर्व माहिती गणेश तोटे यांनी प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments