Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप सासवड प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले गतिमान नेतृत्व असून, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राला लाभलेले कृतिशील नेतृत्व आहे, हे दोघेही महाराष्ट्राचे अनमोल हिरे आहेत, या दोघांच्या कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्र राज्य देशभरात प्रगतीपथावर जाईल, अशी भावना पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष व वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या वतीने भिवरी येथील कानिफनाथ विद्यालय या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, दहावीच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात शिष्यवृत्ती, असे या प्रकारचे वाटप करण्यात आले. यावेळी भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती( नाना) कटके, भाजप पुरंदर तालुका अध्यक्ष संदीप कटके, उपाध्यक्ष दिलीप (आप्पा) कटके, खजिनदार पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शांताराम (आबा) कटके, संचालक गुलाब (आप्पा) घिसरे, माजी उपसरपंच भरत गायकवाड, बाळासो फडतरे, हनुमंत साळुंखे, भाऊसो कटके, शाळेचे मुख्याध्यापक गुरव सर व त्यांचे सर्व सहकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments