Hot Posts

6/recent/ticker-posts

राजे उमाजी नाईक यांना जर फाशी दिली नसती; तर दुसरा महाराज झाला असता तो म्हणजे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय 234 जयंती सोहळा भिवडी ता. पुरंदर येथील स्मारकाचे अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम, गोपीचंद पडळकर आमदार, दौलत (नाना) शितोळे, माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भिवडी ता. पुरंदर येथील हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूलच्या प्रांगणामध्ये मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून, नतमस्तक होत आहे, दख्खन इतिहासातील राजे उमाजी नाईक यांचा इतिहास हा मोठा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य झेंडा लावला यात बहिर्जी नाईक होते, उमाजी नाईक यांनी इंग्रज विरुद्ध लढाई केली, उमाजी नाईक यांच्या उज्वल इतिहासाचा इंग्रज अधिकारी यांनी लिहिलेल्या पत्राचा उलगडा मुख्यमंत्री यांनी केला, कोणत्याही गरिबावर अन्याय होणार नाही, हे आदेश राजे उमाजी नाईक यांनी काढले. उमाजी नाईक यांना फाशी दिली तरी पुढे, लढाई रामोशी बेरड समाजाने सुरू ठेवली, लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय मागील आठवड्यातील प्रस्ताव मंजूर झाला असून, पोलीस भरतीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त रामोशी बेरड समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाचा विचार करताना, ओबीसी समाज अहित होईल हे, आम्ही असा कधीही दुजाभाव अजिबात करत नाही, मराठवाड्यामध्ये 1948 पर्यंत निजाम राज्य असल्याने, हैदराबाद गॅजेट मान्य केलंय, खरी नोंद असलेल्या व्यक्तीला कुणबी दाखला मिळणार आहे, ओबीसी अहित आम्ही होऊ देणार नाही, ओबीसी महामंडळ आणि अनेक योजना देणारे हे सरकार आहे. ओबीसी हित करणं हे शिवकार्य असून, ते आम्ही करणार आहोत, तर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक हे दिवे येथील दहा एकर क्षेत्रात न होता ,ते म्हणजे भिवडी येथील त्यांच्याच क्षेत्रांमध्ये होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम, गोपीचंद पडळकर आमदार, विक्रम पाचपुते आमदार, गणपत शितकल, मोहन मदने आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार चार व्यक्तींना देण्यात आला. तर जीवन गौरव पुरस्कार देताना बाबुराव जमादार, छगन जाधव, व बाबुराव चव्हाण यांना देण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, रणजीतसिंग नाईक निंबाळकर खासदार, राहुल कुल आमदार, प्रकाश धारिवाल, विजय शिवतारे, सचिन पाटील आमदार, संजय जगताप ,संग्राम थोपटे, अशोक टेकवडे माजी आमदार, बाबाराजे जाधवराव, शामकांत भिंताडे, लाला भंडलकर, अंकुश जाधव, मोहन मदने, गणपत शितकल, साकेत जगताप, आनंद (भैया) जगताप, विकास भांडवलकर, अक्षय भांडवलकर, यशवंत भांडवलकर, ओंकार चव्हाण, जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी, वर्षा लांडगे प्रांत, विक्रम राजपूत तहसीलदार, संदीप सिंग गिल ग्रामीण अधीक्षक पुणे, राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड, तर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दौलत (नाना) शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश जाधव व गणपत शितकल यांनी केले. तर आभार प्रदर्शन गंगाराम जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments