पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी गणरायाला वाजत गाजत निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रथ, विद्युत रोषणाई देखावे पारंपारिक वाद्यांचा वापर तर प्रामुख्याने सासवड शहरात झाज पथकाची सलामी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाकेच्या आतिषबाजी मध्ये डीजेच्या दणदणाटामध्ये सासवड शहरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळ यांचे विसर्जन मिरवणूक तब्बल 12 तासांनी उत्साही व शांततेत पार पडली, विसर्जन मिरवणुकीमध्ये मराठमोळी, वेशभूषा केलेल्या महिला व पुरुषांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये परंपरा जपत निरोप गणरायाला दिला. सर्वच गणेश मूर्तींचे विसर्जन हे रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान झाले. सासवड ता. पुरंदर येथील प्रथेप्रमाणे दुपारी बारा वाजता अमर गणेशोत्सव मंडळाच्या श्रीची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावचे पाटील संग्राम जगताप, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी )जगताप, यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शहरातील सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका जय प्रकाश चौक, आमर चौक, चांदनी चौक, नवजीवन चौक या मार्गावरून, पार पडल्या. सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान, मूर्तींचे विसर्जन झाले जे प्रकार चौकामध्ये मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, नगरपालिकेच्या वतीने मंडळाचे स्वागत करण्यासाठी परंपरा कायम राखण्यात आली. सकाळी लवकरच संगमेश्वर मंदिर, संत सोपान देव मंदिर आणि वटेश्वर मंदिर करा नदीत घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या हौदामध्ये सर्वच मूर्तींचे विसर्जन झाले, कलशांमध्ये सर्व निर्माल्य गोळा करण्यात आले, पालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य केल्याचे पालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले. सासवड शहरांमध्ये गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अखिल तारा दत्त पार्क गणपती मंडळाचे अध्यक्ष शुभम जगताप, उपाध्यक्ष सौरभ जगताप, यश चाचर, सचिव अनिकेत जगदाळे व अन्य सदस्य पत्रकार बापू मुळीक यांनी अखिल तारा दत्त पार्क गणपतीचे मिरवणूक ही प्रामुख्याने मंदिरापासून पूर्णपणे डांबरी रोड पर्यंत महिला मंडळ, युवा कार्यकर्ते ,मंडळाचे सर्व सदस्य ,पदाधिकारी, यांनी वाजत गाजत गणरायाला निरोप दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, 7 पोलीस अधिकारी, ५५ पोलीस कर्मचारी, 25 होमगार्ड यांचा ताफा हा तैनात गणपतीसाठी होता अशी माहिती गुप्त विभागाचे पोलीस स्टेशन सासवड रुपेश भगत यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments