जेजुरी गडावर उमाजी राजे नाईक यांना अभिवादन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जेजुरी( ता. पुरंदर) गडावर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री मार्तंड देवस्थानांचे प्रमुख विश्वस्त मंगेश कोणे यांच्या हस्ते व उमाजी राजेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थित आणि पुष्पगुष्टी करून, मानवंदना दिली. यावेळी विश्वस्त पोपट खोमणे, ऍडव्होकेट विश्वास पानसे, विश्व हिंदू परिषदेचे राजाभाऊ चौधरी, कामगार नेते सुरेश उबाळे, माजी नगरसेवक संपत कोळेकर, मार्तंड देवस्थान जेजुरीचे व्यवस्थापक आशिष बाठे, पोपट बोडरे, सुंदर खोमणे, मनोज आडके, शिवाजी चव्हाण, राजेंद्र खोमणे, संपदा खोमणे, रंजना खोमणे, मंदा खोमणे भाजपा महिला आघाडीचे अध्यक्ष उमा खुटे आदी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खोमणे यांनी प्रास्ताविक केले, तर सागर खोमणे यांनी सूत्रसंचालन केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments